Content-Length: 108297 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5

नेतृत्व - विकिपीडिया Jump to content

नेतृत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते. ते प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्याअसे म्हणले जाते. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा सातत्याने विस्तार होत गेल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात विविध संघटना निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा सर्व संघटनांसाठी प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असते. 'नेतृत्व म्हणजे संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण व समन्वय करणे होय’.[] नेतृत्वाच्या विविध विचारवंतांनी विविध व्याख्या केल्या आहेत. मेरी पार्कर फॉलेट नेतृत्वासंबंधी विचार मांडतांना म्हणतात 'केवळ प्रभुत्व स्थापन करणे, नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही’ ' Leader & Export' या शोध निबंधात त्या म्हणतात 'जी आपल्या समूहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच सदस्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणे माहीत असते, अशी व्यक्ती नेता असते’.[]

  • पदावर आधारित नेतृत्व
  • व्यक्तिमत्त्वावर आधारित नेतृत्व
  • कार्यावर आधारित नेतृत्व.
  • राजकीय पक्षाचे नेतृत्व
  • शासनाचे नेतृत्व
  • शिक्षण संस्थांचे नेतृत्व
  • आर्थिक नेतृत्व
  • प्रशासकीय नेतृत्व
  • सामाजिक संघटनांचे नेतृत्व
  • नेतृत्वाचे मुख्य कार्य :
  • नेतृत्वासाठी आवश्यक गुण :

संदर्भ

[संपादन]
  1. ^ प्रशासकीय सिद्धान्त.(पृ.क्र.१३७) प्रा.व्ही.के.सलगरे. कैलास पब्लिकेशन्स. औरंगाबाद.
  2. ^ प्रशासकीय विचारवंत. (पृ.क्र.१२१) लेखक: शाम शिरसाठ, जितेंद्र वासनिक, भगवानसिंग बैनाडे. प्रकाशक: ज्ञानसमिधा पब्लिशिंग वर्ल्ड. औरंगाबाद.








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy