Content-Length: 154765 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87

वांगे - विकिपीडिया Jump to content

वांगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वांग्याची पाने व फळ

वांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधातसमशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.

वांग्याला हिंदीत बैंगन व इंग्रजीत Brinjal किंवा Eggplant म्हणतात. संस्कृतमध्ये वृन्तांकम्, भण्टाकी असे दोन शब्द आहेत.

निघण्टु रत्नाकर या ग्रंथात वृन्तांकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो. तसेच 'वृन्तांकम् बहुबीजानाम् कुष्मांडम् कोमलं विषम् | अर्थात - खूप बिया असलेले वांगे व फारच कोवळे कोहळे खाल्ले असता ते विषाप्रमाणे बाधते असे आयुर्वेदात नमूद केले आहे.-

टोपलीत ठेवलेली जांभळ्या सालीची वांगी

वांग्यांची भाजी करतात. मोठ्या आकारमानाच्या काळ्या वांग्यांचे भरीत करतात. वांगी घालून वांगीभात होतो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.

जाती

[संपादन]

वांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.

  • वांग्याच्या पारंपरिक जाती -गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाची वांगी. ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अश्या दोन जातींची वांगी, आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात.
  • जाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड आहेत .
  • महाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब
  • सुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.

लागवड

[संपादन]

वांग्याची आधी रोपे तयार करून नंतर ती पुनर्लागवड पद्धतीने पेरली जातात. निचरा होणाऱ्या जमिनीत यांची लागवड केली जाते.

वांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जनुकीय गुणधर्म सारखे असतात. परंतु ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. कारण सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. वांग्याच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पीक पिवळे पडते, वांग्यांची वाढ होत नाही..[]

वांग्यासंबंधी मराठी पुस्तके

[संपादन]
वांग्याची भाजी
  • गवार, भेंडी व वांग्याचे पदार्थ (प्रिया नाईक)
  • वांगी मिरची टोमॅटो लागवड (डॉ. भी.गो. भुजबळ, डॉ. बी.बी. मेहेर)
  • वांगी लागवड (डॉ. वि.ग.राऊळ)
  • वांग्याचे चविष्ट रुचकर ५० प्रकार (ज्योती राठोड)
  • वांग्याचे रुचकर ४३ प्रकार (ज्योती राठोड)
  • वांग्याच्या पारंपरिक भाज्या (ज्योती राठोड)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy