अंदमान आणि निकोबार बेटे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भारतातील केंद्रशासित प्रदेश | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | केंद्रशासित प्रदेश | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | दक्षिण भारत | ||
स्थान | भारत | ||
राजधानी | |||
अधिकृत भाषा | |||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
?अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह भारत | |
— केंद्रशासित प्रदेश — | |
{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ८,२४९ चौ. किमी |
राजधानी | पोर्ट ब्लेअर |
मोठे शहर | पोर्ट ब्लेअर |
जिल्हे | २ |
लोकसंख्या • घनता |
३,५६,१५२1 (३२) (इ.स. २००१) • ४३/किमी२ |
भाषा | निकोबारी, बंगाली, इंग्रजी, हिंदी,तमिळ, मल्याळम, तेलुगू |
लेफ्टनंट गव्हर्नर | लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग |
स्थापित | जानेवारी ११ इ.स. १९५६ |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AN |
संकेतस्थळ: tourism.andaman.nic.in/ | |
1लोकसंख्या भारतातील २००१ ची जनगणनेनुसार. |
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा अंदमान आणि निकोबार बेटे हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेयेस ही बेटे समाविष्ट आहेत. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
नाव आणि इतिहास
[संपादन]‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान).[ संदर्भ हवा ] दुसऱ्या मतानुसार, अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूलनिवासी जमाती जमातीवरून पडलेले आहे.
‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५० च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.
काळे पाणी
[संपादन]अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. सावरकरांनी त्यांच्या 'कमला' काव्याची निर्मिती या ठिकाणच्या सेल्युलर जेलमध्ये केली. कोणतेही लेखन साहित्य नसताना ही निर्मिती केली गेली होती.
जिल्हे
[संपादन]अंदमान-निकोबारमध्ये एकूण ३ जिल्हे आहेत.
१) उत्तर आणि मध्य अंदमान
२) दक्षिण अंदमान
३) निकोबार
द्वीपसमूहातील बेटांची नावे
[संपादन]या समूहात असलेल्या रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटाचे 'शहीद द्वीप', तर 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप' अशी बदलेली नावे आहेत.[१][२]
अंदमानवरील पुस्तके
[संपादन]- अंडमान तथा निकोबार द्वीप समूह (हिंदी, बहादुर राम टमटा)
- अंडमान निकोबार की लोक कथाएँ (हिंदी, बलराम आगरवाल)
- अंतरंग : अंदमान निकोबार (केशर मेश्राम)
- अंदमानचे स्वप्न (मूळ कानडी भाषेतल्या रहमत तरीकेरे यांच्या प्रवासवर्णनात्मक पुस्तकाचा मराठी अनुवाद, अनुवादक - ए. आर. यार्दी)
- काळे पाणी (कादंबरी, लेखक वि.दा. सावरकर)
- क्रांतितीर्थ (अंदमानचा सर्वस्पर्शी लेखाजोखा, लेखक मधु आडेलकर) : अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ यांची तपशीलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह अगदी तारीख-वार, स्थळ-काळासकट नोंद केलेली आहे. यावरून हे समजते की १८५७ च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, नबाब, कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार असे सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते.
पाच वेळा अंदमानचे अभ्यास दौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी व इतिहासाचे भान जपत, वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
- क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे)
- चलो चले अंण्डमान (हिंदी, प्रीति अगरवाल)
- देवभूमी अंदमान (नितीन लाळे)
- पाचूची बेटे - अंदमान निकोबार (शैला कामत)
अर्थव्यवस्था
[संपादन]कृषी
अंदमान-निकोबारमधील एकूण ४८,६७५ हेक्टर (१२०,२८० एकर) जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते. अन्नपदार्थ, अंदमान ग्रुप बेटांमध्ये मुख्यत्वे घेतले जाते, तर नारळ आणि अंडकोट हे निकोबार ग्रुप बेटांची रोख पिके आहेत. रब्बी हंगामात डाळी, तेलबिया आणि भाजीपाला इत्यादी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या डोंगराळ प्रदेशात आंबा, सांता (Kinnow?), संत्री, केळी, पपया, अननस आणि रूट पीक यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचे पीक घेतले जाते. मटि(??), लवंग, जायफळ आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांची पिके एक मल्टि-स्तरीय पीक पद्धती अनुसरून उगवली जातात. या बेटांवर रबर, लाल तेल, हस्तरेखा(??), नॉन आणि काजू मर्यादित प्रमाणात होतात.
उद्योग
अंदमान-निकोबारमध्ये १,३७४ नोंदणीकृत लघु-स्तरीय, गावे आणि हस्तकला एकके आहेत. यांशिवाय शेल (??) आणि लाकूड हस्तकला हीही एकके आहेत. मध्यम आकाराची चार औद्योगिक एकके देखील आहेत. एसएसआय युनिट्स पॉलिथीन पिशव्या, पीव्हीसी कंड्यूट पाईप्स आणि फिटिंग्ज, पेंट्स व वार्निश, फायबर ग्लास आणि मिनी आट(??) मिल्स, सॉफ्ट ड्रिंक आणि पेये इत्यादींच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहेत. लहान आकाराची हस्तकला एकके शिंपले, बेकरी उत्पादनांमध्ये गुंतलेले आहेत. तांदूळ गिरण्या चालवणे, फर्निचर बनविणे हेही उद्योग अंदमान-निकोबारमध्ये चालतात..
अंदमान आणि निकोबार बेटे इन्टिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग आणि औद्योगिक वित्तपुरवठा या क्षेत्रांत विस्तारले आहेत. ते अलायन्स एर / जेट एरवेजसाठी अधिकृत एजंट म्हणून काम करतात. बहुतेक स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे असल्याने ही बेटे एक पर्यटन स्थळ बनली आहेत.[३]
पर्यटन
मुख्य लेख : अंडमान आणि निकोबार बेटांमधील पर्यटन
अंदमान आणि निकोबार बेटे ही परदेशी समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे जागतिक प्रवाशांच्या भेटीची बेटे, तसेच समान नामांकित, स्नॉर्केलिंग आणि समुद्र-चालनासारख्या साहसी खेळांच्या अद्भुत संधींसह प्रमुख पर्यटन केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. एनआयटीआय (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया)च्या अंतर्गत वेगवेगळ्या बेटांचा विकास करण्याची योजना चालू आहे. अव्हिस आयलॅंड, स्मिथ आयलॅंड आणि लाँग आयलंडमध्ये शासनाच्या सहभागाने लक्झरी रिसॉर्ट्स नियोजित आहेत.[४]
पोर्ट ब्लेअरमध्ये, मुख्य ठिकाणे म्हणजे सेल्युलर जेल, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चथम सॉ मिल, मिनी झू, कॉर्बिन्स कॉव्ह, चिडिया टापू, वंदूर बीच, फॉरेस्ट म्युझियम, ॲँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम, फिशरीज म्युझियम, नवल संग्रहालय (सामुद्रिका), रॉस बेट आणि उत्तर बे बेट. पूर्वी भेट देता येत असलेले वायपर बेट आता प्रशासनाने बंद ठेवले आहे. रावळगर बीचसाठी नील आयलॅंड, स्कुबा डायविंग / स्नॉर्केलिंग / समुद्रचालनासाठी, सिंक बेट, सॅडल पीक, माउंट हॅरिएट, माड ज्वालामुखी व हॅवेलॉक बेट आहे. उत्तर अंदमान येथे असलेल्या दिगलीपूर हेदेखील २०१८पासून लोकप्रिय आहे आणि बरेच पर्यटक उत्तर अंदमान येथे देखील येऊ लागले आहेत. दक्षिणी गट (निकोबार बेटे) बहुतेक पर्यटकांना उपलब्ध नसतात.
ऊर्जा निर्मिती
जपानच्या साहाय्याने, दक्षिणी अंदमान द्वीपसमूहात आता १५-मेगावॅट डिझेल पॉवर प्लांट असेल. चीनहून होणाऱ्या तेल पुरवठ्यासाठी एक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चोक पॉईंट असेल. जलसंध्यां(??)जवळील नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही इंडो-जपानी रणनीति असल्याचे मानले जाते.[५][६]
अंदमान पर्यटन स्थळे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ पीटीआय, पोर्टब्लेअर. "Modi renames Ross, Havelock and Neil islands in the Andamans". ३१ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.(इंग्रजी मजकूर)
- ^ ज़ी न्यूज़ डेस्क. "अंडमान-निकोबार के 3 आइलैंड के नाम बदले जाएंगे, अब कहलाएंगे सुभाषचंद्र बोस, शहीद और स्वराज द्वीप". ३१ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले. (हिंदी मजकूर)
- ^ "Backpacking in the Andaman and Nicobar Islands, Portblair, beaches,". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-12-21. 2019-01-30 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Holistic Development of Islands for Islanders' Benefits | NITI Aayog, (National Institution for Transforming India), Government of India". niti.gov.in. 2019-01-30 रोजी पाहिले.
- ^ Barry, Ellen (2016-03-13). "India collaborates with Japan on Andamans project". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-01-30 रोजी पाहिले.
- ^ "These 8 narrow chokepoints are critical to the world's oil trade". Business Insider. 2019-01-30 रोजी पाहिले.