क्वीचौ
Appearance
क्वीचौ 貴州省 | |
चीनचा प्रांत | |
क्वीचौचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | क्वीयांग |
क्षेत्रफळ | १,७६,१६७ चौ. किमी (६८,०१८ चौ. मैल) |
लोकसंख्या | ३,४७,३६,४६८ |
घनता | २०० /चौ. किमी (५२० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-GZ |
संकेतस्थळ | http://www.gzgov.gov.cn/ |
क्वीचौ (देवनागरी लेखनभेद: ग्वीचौ ; सोपी चिनी लिपी: 贵州; पारंपरिक चिनी लिपी: 貴州; फीनयिन: Gùizhōu; ) हा चीन देशाच्या नैऋत्येकडील प्रांत आहे. क्वीयांग येथे क्वीचौची राजधानी आहे.
भूगोल
[संपादन]क्वीचौच्या उत्तरेस सिच्वान प्रांत व चोंगछिंग महानगर क्षेत्र असून, पूर्वेस हूनान, दक्षिणेस क्वांग्शी, तर पश्चिमेस युइन्नान हे प्रांत आहेत. क्वीचौचा पश्चिमेकडील मुलूख डोंगराळ असून तो युइन्नान-क्वीचौच्या पठाराचा भाग आहे. प्रांताचा पूर्वेकडील व दक्षिणेकडील मुलूख काही अंशी सखल आहे.
क्वीचौचे हवामान दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारात मोडणारे आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान १०° - २०° सेल्सियस असून, जानेवारीत पारा १° ते १०° सेल्सियसांदरम्यान राहतो, तर जून महिन्यात पारा १७° ते २८° सेल्सियसांदरम्यान राहतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- क्वीचौ शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)
- चिनी सांस्कृतिक मंत्रालयाचे संकेतस्थळ - क्वीचौविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)
चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग
| |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|